अभिनेत्री कंगना राणावत यांच्यासह ४ जणांवर गुन्हा नोंद
मुंबई – ‘दिद्दा : द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर’ पुस्तकाच्या लेखकाच्या ‘कॉपीराईट’च्या उल्लंघनाच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी १२ मार्च या दिवशी अभिनेत्री कंगना राणावत, कमल कुमार जैन, रंगोली चंदेल आणि अक्षत राणौत यांच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
A case of alleged cheating was filed against actor #KanganaRanaut by the #Mumbai Police on Friday on a local court’s orders after the author of ‘Didda: The Warrior Queen of Kashmir’ accused her of copyright violationhttps://t.co/9HlFNyJ8w6.
— The Hindu Cinema (@TheHinduCinema) March 13, 2021
‘दिद्दा : द वॉरियर क्वीन ऑफ काश्मीर’ या पुस्तकाची हिंदी अनुवादित आवृत्ती ‘दिद्दा : काश्मीरची योद्धा राणी’ या नावाने आली आहे. काश्मीरची राणी आणि लोहारची राणी दिड्डा (पुंछ) यांचे अधिकार आमच्याकडे आहेत. कंगना यांनी हे पुस्तक आणि कथा यांवर स्वतःचा अधिकार कसा सांगितला आहे, हे आमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे’, असे या पुस्तकाचे लेखक आशिष कौल यांनी दंडाधिकार्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी वरील ४ जणांवर गुन्हा नोंद केला आहे.