महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?
एरव्ही देशात हिवाळ्यामध्ये शीतलहर येत असते. हिमालयात तर तापमान शून्याच्या खाली ४० सेल्सियसपर्यंत गेलेले असते. सध्याच्या आत्पकाळामध्ये शीतलहर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतेच अमेरिकेतील टेक्सासमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. त्यातच येथील वीजपुरवठ्यामध्ये मोठा बिघाड झाल्याने नागरिकांना हिटरचा वापर करता आला नाही. नळाचे पाणी गोठल्याने पाणीपुरवठाही बंद झाला होता. अन्न बनवण्यासाठी विजेच्या उपकरणांचाही वापर करता न आल्याने येथील नागरिकांची काही दिवस ससेहोलपट झाली. याला आपत्काळच म्हणावा लागेल. अशी स्थिती सर्वत्र झाल्यास त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानीही होऊ शकते. या लेखात भारतात शीतलहर आल्यावर साधारणतः काय उपाययोजना करता येईल, याची माहिती देण्यात आली आहे.
भाग ७.
भाग ६. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/456911.html
६. शीतलहर
६ अ. शीतलहर म्हणजे काय ? : ‘सामान्यतः वातावरणातील तापमान उणे शून्य सेल्सियसपर्यंत गेल्यावर त्याला ‘शीतलहर’ आहे, असे म्हटले जाते.
६ आ. शीतलहरीमुळे होणारे त्रास
६ आ १. ‘हायपोथर्मिया’पासून सतर्क रहावे ! : अधिक गारठ्यामुळे काही जणांना ‘हायपोथर्मिया’चा त्रास होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या शरिराचे एक सामान्य तापमान असते, जे शरिराकडून नियंत्रित केले जाते. जेव्हा या सामान्य तापमानाच्या खाली शरिराचे तापमान गेले, तर त्याला ‘हायपोथर्मिया’ म्हटले जाते. हा प्राणघातक ठरू शकतो; कारण या तापमानाला तोंड देण्यासाठी आवश्यक उष्णता शरीर निर्माण करू शकत नाही. विशेषतः नवजात बालके आणि वृद्ध यांना याचा धोका अधिक असतो. त्यामुळे कुणाला अधिक गारठा होऊन हुडहुडी भरत असेल, त्याला अधिक उष्णता निर्माण होण्यासाठी कपडे, कांबळे द्यावेत. त्याचे कपडे भिजले असतील, तर ते पालटावेत. उष्णता निर्माण करणारे पेय पिण्यास द्यावे. आवश्यकतेनुसार आधुनिक वैद्यांचा सल्ला घ्यावा.
६ इ. शीतलहरीपासून रक्षण होण्यासाठी करायची पूर्वसिद्धता : थंडीच्या दिवसांत घालायचे कपड्यांचा पुरेसा साठा करून ठेवावा, उदा. स्वेटर किंवा जॅकेट, मफलर, शाल, कानटोपी, हात आणि पाय मोजे, गोधडी, रजई, कांबळे (ब्लँकेट) आदी. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ते पुरतील, असे पहावे. वृद्धांना थंडीचा अधिक त्रास होऊ शकत असल्याने त्यांच्यासाठी पुरेसे कपडे आहेत ना, ते पहावे.
६ ई. प्रत्यक्ष शीतलहर असतांना काय करावे ?
१. थंडीमुळे जलवाहिन्यांमधील पाणी गोठण्याची शक्यता असल्याने या काळात घरात पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा.
२. ओले कपडे घालू नये. काही कारणाने कपडे ओले झाले, तर ते पालटून सुके कपडे घालावे.
३. नियमित उष्ण पेय आणि पदार्थ खावेत.
४. मद्यपान करू नये. ते केल्यामुळे शरिरातील उष्णता न्यून होते.
५. थंडीमुळे हातापायाची बोटे, कानाच्या पाळ्या, नाकाचे टोक आदी सुन्न होऊ शकत असल्याने त्याकडे लक्ष द्यावे आणि त्यांना उष्णता कशी मिळेल, ते पहावे.
६. थंडीमुळे सुन्न पडलेल्या भागांचे मर्दन करू नये. मर्दन केल्यास हानी होऊ शकते.
७. सुन्न पडलेला भाग, उदा. हातपाय आदी कोमट (अती उष्ण नव्हे) पाण्यामध्ये बुडवून ठेवू शकतो.
८. शीतलहरच्या काळात शक्यतो घराबाहेर पडू नये. बाहेर गेल्यानंतर कापरे भरत असल्यास तात्काळ घरी परत यावे.
९. घरामध्ये शक्य असल्यास हिटरचा वापर करावा.
१०. दूरचित्रवाणी किंवा नभोवाणी यांवरील हवामानविषयीची माहिती, तसेच त्याविषयी देण्यात येणार्या सूचनांकडे लक्ष देऊन त्यांचे पालन करावे.’
(संदर्भ : pocketbook-do-dont-hindi)
भाग ८. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –
‘परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांचे आपत्काळात रक्षण कसे करणार आहेत ?’, याची साधिकेने अनुभवलेली एक झलक !अधिवक्त्या प्रीती पाटील‘नोव्हेंबर २०२० मध्ये मी मुंबई येथे सेवेसाठी गेले होते. त्या वेळी मी ज्या साधक कुटुंबाकडे गेले होते, त्यांची सदस्य संख्या अत्यंत अल्प होती. सकाळच्या महाप्रसादासाठी पोळी-भाजी आणि रात्रीच्या महाप्रसादासाठी भात अन् आमटी, असे तेथे महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. मी सकाळच्या महाप्रसादाच्या वेळी श्री अन्नपूर्णादेवीला पोळी आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर मी हात जोडून प्रार्थना करण्यासाठी डोळे मिटले. तेव्हा मला पुढील दृश्य दिसले. मी दाखवलेला नैवेद्य श्री अन्नपूर्णामातेने ग्रहण केला आणि तिने तृप्त होऊन ढेकर दिली. त्यानंतर मला सनातनचे सर्व साधक दिसले. श्री अन्नपूर्णामातेने ढेकर दिल्यानंतर त्या सर्व साधकांची भूक भागली होती आणि त्यांचा तोंडवळाही प्रसन्न दिसत होता. या प्रसंगात ‘विष्णुस्वरूप गुरुमाऊली आपत्काळात साधकांचे रक्षण कसे करणार आहेत ?’, हे मला अनुभवायला मिळाले आणि त्या क्षणी ‘शब्दापलीकडील कृतज्ञता कशी असते ?’, हेही मला अनुभवता आले. यासाठी मी विष्णुस्वरूप गुरुमाऊलींच्या चरणी अत्यंत शरणागतभावाने कृतज्ञ आहे.’ – अधिवक्त्या प्रीती पाटील, सांगली (१५.१२.२०२०) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |