कोंडेनूर (केरळ) येथील ‘नक्षत्रवना’तील वृक्षांच्या संदर्भात केलेले संशोधन !
वनस्पतींविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘ज्योतिषशास्त्रात ‘अश्विनी’, ‘भरणी’ इत्यादी २७ नक्षत्रे आहेत. पंचांगात प्रत्येक नक्षत्रासाठी विशिष्ट वृक्षाचा उल्लेख केलेला असून त्याला त्या नक्षत्राचे ‘आराध्यवृक्ष’ म्हणतात, उदा. अश्विनी नक्षत्राचा ‘कुचला’ हा आराध्यवृक्ष आहे. व्यक्तीला विशिष्ट प्रसंगी, उदा. संकट-निवारणार्थ तिच्या जन्म-नक्षत्राशी संबंधित वृक्षाची म्हणजेच आराध्यवृक्षाची उपासना करण्यास सांगितले जाते. भारतातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, केरळ इत्यादी राज्यांमध्ये ‘नक्षत्रवने’ उभारण्यात आली आहेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन गटाने २२.२.२०१९ या दिवशी केरळ राज्यातील कोंडेनूर येथील ‘श्री नित्यानंद योगाश्रमा’ला भेट दिली. येथील नक्षत्रवनात २७ नक्षत्रांशी संबंधित वृक्ष आहेत. या वृक्षांतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी त्यांची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
‘विदेशातील संशोधनाविषयी सगळे कौतुक करतात. कौतुक करणार्यांना या लेखात दिल्याप्रमाणे भारतात सहस्रो वर्षांपूर्वी झालेल्या संशोधनाविषयी थोडी तरी कल्पना आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण
नक्षत्रवनातील वृक्षांत ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आहे, हे पुढील सारणीवरून लक्षात येते.
२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. नक्षत्रवनातील वृक्षांमध्ये सात्त्विकता असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळणे : ज्योतिषशास्त्रातील २७ नक्षत्रांशी संबंधित वृक्षांमध्ये विशेष गुणधर्म आहेत, उदा. आवळी, कडुलिंब यांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे त्यांचा उपयोग आयुर्वेदात रोग-निवारणार्थ करण्यात येतो. बेल, औदुंबर इत्यादी वृक्षांमध्ये विशिष्ट देवतांची तत्त्वे आकृष्ट करण्याची क्षमता आहे, उदा. बेलाच्या पानांमध्ये शिवतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता आहे. ‘दैवी वृक्षांतील देवता तत्त्वांचा मानवाला आध्यात्मिक लाभ व्हावा’, यासाठी आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी त्यांची मानवी जीवनातील विविध कृतींशी सुरेख सांगड घालून दिली, उदा. देवपूजेत विशिष्ट देवतेला विशिष्ट पत्री वहाणे (शिवाला बेल वहाणे), दैवी वृक्षांचे पूजन करणे (औदुंबर, पिंपळ यांचे पूजन करणे) इत्यादी. ज्योतिषशास्त्रातील २७ नक्षत्रांशी संबंधित वृक्ष सात्त्विक असून त्यांच्यामध्ये चैतन्य आहे. ‘श्री नित्यानंद योगाश्रम’ येथील नक्षत्र वनातील वृक्षांमध्ये सात्त्विकता असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली.’ ॐ
– प्रा. सुहास जगताप, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.१.२०२१)
ई-मेल : mav.research2014@gmail.com