आतंकवादाला प्रोत्साहन देणारी कुराणातील आयते हटवा !

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

  • मुसलमान संघटनेकडून वसीम रिझवी यांचा शिरच्छेद करण्याचा फतवा !
  • भारतात कायद्याचे राज्य असतांना अशा प्रकारचा फतवा कसा काढला जातो ? जर रिझवी न्यायालयात गेले आहेत, तर त्यांना न्यायालयात विरोध का करण्यात येत नाही ? रिझवी यांचा शिरच्छेद करण्याचा फतवा काढणारे धर्मांध न्याययंत्रणेला जुमानत नाहीत, हेच यातून दिसून येते !
  • भारतात प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य दिले आहे. जर रिझवी यांना ‘आतंकवाद रोखण्यासाठी काही करावे’, असे वाटत असेल आणि त्यातून ते अशा प्रकारची याचिका प्रविष्ट करत असतील, तर न्यायालय योग्य तो निर्णय देईल !
शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी कुराणामधील २६ आयते हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. ‘यांतील काही आयते आतंकवादाला प्रोत्साहन देणारी आहेत’, असे या याचिकेत म्हटले आहे.

या याचिकेमुळे मुसलमानांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. ‘शियाने हैदर-ए कर्रार वेलफेयर असोसिएशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हसनैन जाफरी डंपी यांनी वसीम रिझवी यांचा शिरच्छेद करून त्यांना शिर आणून देणार्‍यास २० सहस्र रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. तसेच रिझवी यांच्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. ‘जे त्यांच्याशी संपर्क ठेवतील, त्यांना घरी बोलावतील त्यांच्यावरही बहिष्कार घालण्यात येईल’, असे त्यांनी म्हटले आहे.