साधनेचे महत्त्व समजल्यावर गांभीर्याने साधना करून स्वतःत पालट करण्याचा प्रयत्न करणारी जळगाव येथील कु. सायली पाटील !
उद्या फाल्गुन शुक्ल पक्ष प्रतिपदा (१४.३.२०२१) या दिवशी जळगाव येथील कु. सायली पाटील हिचा वाढदिवस आहे. सध्या ती रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निमूर्र्लनाची प्रक्रिया करत आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रामनाथी येथील एका साधकाला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. सायली पाटील हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. जवळीक साधणे
‘कु. सायलीच्या स्वभावात पुष्कळ सहजता आहे. तिच्याशी बोलतांना ‘आपण नवीन कुणाशी बोलत आहोत’, असे वाटत नाही. तिच्या सहज स्वभावाने ती सर्वांशी जवळीक साधते. ती सर्वांची प्रेमाने विचारपूस करते आणि आवश्यकतेनुसार साहाय्यही करते.
२. साधनेचे गांभीर्य
अ. स्वतःमधील स्वभावदोष घालवण्यासाठी ती स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गांभीर्याने अन् तळमळीने करत आहेे.
आ. ती नामजपादी उपाय पूर्ण करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करते. कधी ती व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमध्ये अल्प पडली, तर तिला त्याविषयी खंत वाटते आणि ती ते प्रयत्न वाढवण्याचा प्रयत्न करते.
इ. स्वतःकडून झालेल्या चुकांविषयी तिला खंत वाटते. त्यासाठी ती देवाची अपराधीपणाने क्षमा मागते.
ई. पूर्वी तिची विचारप्रक्रिया आणि जगण्याची पद्धत साधनेच्या विचारांपासून वेगळी होती. साधनेचे महत्त्व समजल्यानंतर तिची स्वतःला पालटण्याची तळमळ वाढली. आता ती स्वतःच्या आवडी-निवडी बाजूला ठेवून स्वतःला पालटण्यासाठी प्रयत्न करत आहे.
उ. तिला दिलेली सेवा ती ‘गुरुसेवा’ या भावाने परिपूर्ण आणि श्री गुरूंना अपेक्षित अशी करण्यासाठी प्रयत्न करते.
३. अनुसंधानात असणे
देव मला पुनःपुन्हा साधनेची संधी देत आहे; पण मीच न्यून पडते. ‘सर्व काही देवाच्या कृपेने आणि त्याच्या नियोजनानुसार होणार आहे’, अशी तिची श्रद्धा आहे. ती मनात येणारे विचार देवाला सांगून देवाशी सूक्ष्मातून बोलते. मनातील भावाद्वारे ती श्री गुरूंना अनुभवण्याचा प्रयत्न करते.
देवा, ‘आमच्यामधील भावभक्ती वाढवून आम्हाला तुझ्या कोमल चरणी घे’, अशी तुझ्या चरणी शरणागतीने भावपूर्ण प्रार्थना आहे.’
– एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.३.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |