गोकुळच्या संचालक मंडळाची निवडणुकीस स्थगिती देण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
कोल्हापूर, १२ मार्च – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे गोकुळ दूध संघाची निवडणूक ३१ मार्चपर्यंत स्थगित करावी, या मागणीसाठी गोकुळच्या संचालक मंडळाने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. ही याचिका १२ मार्च या दिवशी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया आहे, तशी चालू ठेवावी, असेही आदेशात म्हटले आहे. दुसरीकडे प्राधिकृत अधिकारी डॉक्टर गजेंद्र देशमुख यांनी ३ सहस्र ६५६ सभासदांची अंतिम मतदार सूची प्रसिद्ध केली आहे.