नियमांचे पालन न करणार्यांवर कठोर कारवाई करा ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
पुणे, १२ मार्च (वार्ता.) – पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे रुग्ण संख्येत वाढ होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. शासनाने दक्षता घेण्यासाठी केलेल्या नियमांचे पालन न करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज विधान भवन येथे घेण्यात आलेल्या बैठकीत दिले. या बैठकीला लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.