अमरनाथ यात्रेतील लंगरवाल्यांच्या अडचणी सोडवाव्यात ! – भाजपचे आमदार टी. राजा सिंह
भाग्यनगर (तेलंगाणा) – अमरनाथ यात्रेमध्ये भाविकांसाठी लंगर लावून विनामूल्य भोजन आणि अन्य व्यवस्था देणार्या लंगरवाल्यांना काही हॉटेलमालकांच्या दबावामुळे त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी याची नोंद घेऊन त्यांना संरक्षण पुरवावे, तसेच त्यांना येणार्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर कराव्यात, अशी विनंती येथील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी केली आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाने या लंगरवाल्यांसाठी काही नियम बनवले आहेत. हे नियम अन्यायकारक असल्याचे सांगत त्यांच्या संघटनेकडून उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याविषयावर टी. राजा सिंह यांनी वरील विनंती केली आहे.