आतंकवादविरोधी पथकाकडून घटनास्थळाची नाट्यरूपांतर करून पहाणी
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण
ठाणे – मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणी आतंकवादीविरोधी पथकाने (ए.टी.एस्.) येथील मुंब्रा रेतीबंदर परिसरात संपूर्ण गुन्हेगारी घटना ‘रिक्रिएट’ केली. या वेळी खाडीला भरती आणि ओहोटी कधी येते, हे जाणून घेण्यासाठी हवामान विभागाचे तज्ञ आणि फॉरेन्सिक पथकही या पथकासमवेत उपस्थित होते. ए.टी.एस्.च्या अधिकार्यांनी स्थानिक मच्छिमार आणि हवामान खाते यांचेही साहाय्य घेतले, तसेच नावेतून फिरूनही घटनास्थळाचा अंदाज घेतला.