कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूरसह राज्यातील ८ प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी १०१ कोटी रुपयांची घोषणा
कोल्हापूर – राज्यातील एकूण ८ प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी १०१ कोटी रुपयांची घोषणा नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील मंदिराचा समावेश आहे. या घोषणेनंतर खिद्रापूरमधील ग्रामस्थांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.
खिद्रापूरमधील प्राचीन कोपेश्वर मंदिर
स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून खिद्रापूरमधील कोपेश्वर मंदिराची वेगळी ओळख आहे. जवळपास ११ व्या शतकात हे मंदिर बांधण्यात आले. मंदिरावर सुंदर कोरीव काम केले आहे. यात इसापनीती, पंचतंत्र, रामायण, महाभारत, ब्रह्मा, विष्णु आणि भगवान शिव यांच्या मूर्ती, तसेच अनेक प्रसंग दर्शवणारे याक्षिणी, यक्ष, नर्तकी, वादक, गायक यांसह अन्य यांचे दगडी कोरीव काम करण्यात आले आहे.