पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नियंत्रण कक्षातून नागरी सुविधा केंद्रात स्थानांतर
मुंबई – मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी वादात अडकलेले मुंबई पोलीस दलातील साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचे नागरी सुविधा केंद्राच्या कक्ष १ मध्ये स्थानांतर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे १२ मार्च या दिवशी वाझे यांचे गुन्हे शाखेतून प्रथम नियंत्रण कक्षात स्थानांतर करण्यात आले होते; मात्र आता पुन्हा त्यांचे स्थानांतर नागरी सुविधा केंद्रात केले गेल्याने एकाच दिवशी त्यांचे २ वेळा स्थानांतर झाले आहे.