बेळगावात शिवसेनेच्या पदाधिकार्यांच्या गाडीवर आक्रमण
शिवसेनेच्या रुग्णवाहिकेला काळे फासले !
कोल्हापूर – एका कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १२ मार्च या दिवशी शिवसेनेच्या एका पदाधिकार्याच्या गाडीवर आक्रमण केले, तसेच शिवसेनेच्या रुग्णवाहिकेला काळे फासले. या रुग्णवाहिकेचा फलकही तोडण्यात आला. सम्राट अशोक चौकाजवळ हा प्रकार घडला. विशेष म्हणजे पोलीस संरक्षणात हा प्रकार झाल्याने सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. (पोलीस बंदोबस्तात जर रुग्णवाहिकेवर आक्रमण होत असेल, तर पोलीस प्रशासनासाठी ही नामुष्कीची गोष्ट आहे ! मराठी बांधवांवर सीमाभागात वारंवार होणारी आक्रमणे पहाता आता केंद्रानेच यात लक्ष घालण्याची वेळ आली आहे ! – संपादक)
या वेळी कन्नड संघटनेचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांच्यात झटापट झाली. शिवसैनिकांनी कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावले.