महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा २१ मार्च या दिवशी होणार !
मुंबई, १२ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एम्.पी.एस्.सी.) परीक्षा २१ मार्च या दिवशी होणार असल्याचे आयोगाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केले आहे. यापूर्वी १४ मार्च या दिवशी होणारी ही परीक्षा रहित करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला होता. परीक्षा रहित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी शासनाच्या विरोधात ११ मार्चला आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांमध्ये पसरलेला असंतोष पहाता आयोगाने परक्षेची तारीख घोषित केली आहे.