इंटेलिजन्स ब्युरोमध्ये कार्यरत असल्याचे खोटे सांगणार्या पुणे येथील तोतया पोलिसाला अटक
पुणे, १२ मार्च – आकुर्डी रेल्वे स्टेशन चौकात विनामास्क फिरणार्यांवर कारवाई करतांना पोलिसांनी प्रतीक भावसार या तरुणाला अडवले. त्याला ५०० रुपये दंड भरण्यास सांगितल्यावर ‘मी आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) देहलीमध्ये कार्यरत आहे’, असे त्याने सांगितले; पण ओळखपत्र दाखवण्यास टाळाटाळ केली. वरिष्ठ पोलिसांनी थेट आयबीमध्ये संपर्क केल्यावर अशी व्यक्ती कार्यरत नसल्याचे उघडकीस आले. नंतर निगडी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.