वाराणसी येथे रुद्राक्षांच्या माळा विकणार्या महिलेचा हात बुटाखाली दाबणार्या पोलिसावर कारवाई
असा उद्दामपणा करणार्या पोलिसांना सेवेतूनच बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथे महाशिवरात्रीच्या दिवशी रस्त्यावर रुद्राक्षाच्या माळांची विक्री करणार्या एका महिलेचा हात बुटाखाली दाबल्याच्या प्रकरणी सुधीर कुमार या पोलिसावर कारवाई करण्यात आली. महिलेच्या हातावर पाय देत असतांनाचे छायाचित्र प्रसारित झाल्यावर ही कारवाई करण्यात आली.
#Varanasi– महाशिवरात्रि पर पुलिस का अमानवीय चेहरा, बुजुर्ग महिला से बदसलूकी का फोटो वायरल, माला बेच रही महिला के साथ किया दुर्व्यवहार, पुलिस कर्मी ने जूते से कुचली रुद्राक्ष की माला, दशाश्वेघ थाने के गौदोलिया चौराहे का मामला। @varanasipolice pic.twitter.com/dMrEk44Gon
— भारत समाचार (@bstvlive) March 11, 2021
‘सुधीर कुमार याची चौकशी केल्यानंतर त्याला निलंबित केले जाईल’, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.