कालकुंद्रीकर कुटुंबियांकडून ज्ञानदीप वाचनालयास सनातनने प्रकाशित केलेले, तसेच अन्य ग्रंथ भेट !
चंदगड (कोल्हापूर) – श्री. दीपक कालकुंद्रीकर आणि सौ. देवकी कालकुंद्रीकर यांच्या विवाहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अन् त्यांचा भाचा सनातनचा साधक कु. ईशान महेश कडणे याच्या ६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले १० ग्रंथ अन् इतर ग्रंथ भेट देण्यात आले. हे ग्रंथ ज्ञानदीप वाचनालयाचे संचालक श्री. के.जे. पाटील यांनी स्वीकारले. वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक व्ययाला फाटा देऊन पुस्तकांच्या रूपाने साहाय्य करून विधायक पायंडा जात असल्याविषयी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी सांगली येथील सनातनच्या साधिका आणि कु. ईशानची आई सौ. सरिता कडणे, सौ. पौर्णिमा गडकरी, तसेच श्री. उमेश गडकरी उपस्थित होते.
या संदर्भात श्री. के.जे. पाटील म्हणाले, ‘‘तुम्ही ग्रंथ देऊन पुष्कळ चांगले कार्य केले आहे. हे कौतुकास्पद आहे. ग्रंथांतील विषय नवीन असून समाजासाठी उपयुक्त आहेत.’’