दळणवळण बंदीमध्ये देशातील १० सहस्र ११३ आस्थापने बंद ! – केंद्र सरकारची माहिती
नवी देहली – एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या १० मासांच्या म्हणजे दळणवळण बंदीच्या कालावधीमध्ये देशातील १० सहस्र ११३ आस्थापने बंद झाली आहेत. त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता स्वेच्छेने त्या बंद झाल्या आहेत, अशी माहिती कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एम्.सी.ए.ने) दिली आहे.
मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देहलीमध्ये सर्वाधिक म्हणजेच २ सहस्र ३९४ उत्तरप्रदेशमध्ये १ सहस्र ९३६, तमिळनाडूमध्ये १ सहस्र ३२२, महाराष्ट्रात १ सहस्र २७९ आणि कर्नाटकमध्ये ८३६ आस्थापने बंद पडली.