१४ गावांच्या पाणीप्रश्नासाठी जीवन प्राधिकरणाचे कार्यालय बंद करू ! – संजय पवार, शिवसेना
कोल्हापूर – गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा ही १४ गावांची योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे चालवण्यात येते. वाढत्या थकबाकीमुळे योजनेतील ग्रामपंचायतींना पाणीपट्टी भरा; अन्यथा नळजोडणी बंद करू, अशी नोटीस कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. उन्हाळ्यातील पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन पाणीपुरवठा बंद करू नये, यांसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्राधिकरणाचे उपअभियंता काटकर आणि शाखा अभियंता लोकरे यांची भेट घेतली. या वेळी पवार यांनी ‘१४ गावांच्या पाणी प्रश्नासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यालय बंद करू’, अशी चेतावणी दिली.