महिलांनी धर्माचरण करणे आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – राजन केसरी, हिंदु जनजागृती समिती, वाराणसी
आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
वाराणसी – भारतीय महिलांकडून मोठ्या प्रमाणात पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत असल्यामुळे त्यांच्यावरील अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. त्यासाठी महिलांंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे आणि स्वरक्षणार्थ प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केसरी यांनी केले.
आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या निमित्ताने ‘रूद्र शक्ति सेना’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या महिला शाखेने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला समितीचे श्री. केसरी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या वेळी विद्यार्थिनींनी आणि महिलांनी त्यांच्यावरील अत्याचारांचा प्रतिकार कसा करावा, याविषयी जागृतीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केेले. याप्रसंगी वक्त्या आणि कार्यक्रमाचे सादरीकरण करणार्या महिला यांना सन्मानित करण्यात आले.
क्षणचित्रे
१. समितीचे श्री. राजन केसरी यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
२. समितीने लव्ह जिहादविषयी मांडलेले विचार आयोजकांना अतिशय आवडले. ते म्हणाले की, या विषयावर आम्हाला सखोल विचार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपण एकत्र येऊन कार्य करण्याविषयी विचार करूया.
३. पुढील कार्यक्रमामध्ये लव्ह जिहाद आणि धर्मशिक्षण यांविषयी माहिती असणारे ग्रंथप्रदर्शन लावण्यास मुख्य आयोजकांनी सांगितले.
४. धर्मप्रेमी श्री. राकेश गुप्ता यांनी या कार्यक्रमाचे ‘फेसबूक लाईव्ह’ आणि छायाचित्रण करण्याची सेवा केली.