कुंभमेळ्यात रुग्ण सेवेसाठी ५४ रुग्णवाहिका उपलब्ध
हरिद्वार – कुंभमेळ्यात पवित्र (शाही) स्नानाच्या दिवशी आपत्कालीन सेवेत २ एम्.आय. रुग्णवाहिका, ५४ चारचाकी आणि ४० दुचाकी रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे मेळाअधिकारी डॉ. अर्जुनसिंह सेंगर यांनी दिली. हर की पौडी येथील घाटांवर ५ आणि पूर्ण कुंभमेळाच्या क्षेत्रात ५० वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. तसेच पावन धाम जवळ १५० खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारण्यात आले आहे. स्नानानिमित्त विविध ठिकाणी थांबलेल्या ५ सहस्र भाविकांची २० वैद्यकीय पथकांद्वारे कोरोनाची पडताळणी करण्यात आली.