पुणे येथील गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रीय
पोलिसांचे भय नसलेले गुन्हेगार कायदा-सुव्यवस्था हातात घेतात, हे चिंताजनक !
पुणे, ११ मार्च – शहरातील गुन्हेगारीवर वचक बसवण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी आंदेकर टोळीवर, तसेच पांडवनगर परिसरात दहशत निर्माण करणार्या जयेश लोखंडे याच्यासह ५ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.
१. जयेश लोखंडे याच्या टोळीने सनी पवार या रिक्शाचालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्या खिशातील ५ सहस्र रुपये बळजोरीने काढून नेले. तसेच पवार यांची रिक्शा, २ चारचाकी आणि १ दुचाकी, तसेच इतरांच्या काही वाहनांची कोयत्याने तोडफोड करून पांडवनगर परिसरात दहशत पसरवली होती. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी टोळीप्रमुख जयेश लोखंडेसह ५ जणांना अटक केली आहे.
२. सर्वांत जुनी टोळी असलेल्या आंदेकर टोळीतील ११ जणांना न्यायालयात उपस्थित केल्यावर विशेष न्यायालयाने त्यांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.