कळंगुट येथे २ निरनिराळ्या छाप्यांमध्ये एकूण १ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात
पणजी – कळंगुट पोलिसांनी ९ मार्च या दिवशी २ निरनिराळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण १ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत. यामधील एका प्रकरणात उत्तरप्रदेश येथील अखिलेश कुमार याच्याकडून ८० सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ, तर दुसर्या छाप्यात हणजूण येथील टॅक्सीचालकाकडून २०७ ग्रॅम गांजा कह्यात घेण्यात आला आहे. (गेली कित्येक वर्षे असे छापे टाकून अमली पदार्थ व्यावसायिकांना कह्यात घेऊनही हा गैरव्यवसाय दिवसेंदिवस फोफावतच आहे. याचे कारण शोधून त्यावर ठोस उपाययोजना करणे शासनाकडून अपेक्षित आहे ! – संपादक)