गुटखा विक्री केल्याच्या प्रकरणी कुडाळ येथील तिघांना आणि दोडामार्ग येथील तिघांना पोलीस कोठडी
सिंधुदुर्गात गुटखा विक्रीच्या विरोधात अन्न सुरक्षा दलाची कारवाई
दोडामार्ग – गुटखा विक्री केल्याच्या प्रकरणी अन्न सुरक्षा दलाच्या पथकाने कुडाळ आणि दोडामार्ग येथे कारवाई केली. कुडाळ येथे तिघांना १ दिवसाची, तर दोडामार्ग येथे कह्यात घेतलेल्या तिघांना येथील न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी बजावली.
कुडाळ शहरातील ३ टपर्यांवर ९ मार्चला रात्री केलेल्या कारवाईत ३ सहस्र ९५२ रुपयांचा गुटखा अन्न सुरक्षा पथकाने कह्यात घेतला. या प्रकरणी चंदन कांबळे, रियाज शेख आणि प्रफुल्ल सामंत या तिघांना १ दिवस पोलीस कोठडी ठोडावण्यात आली.
दोडामार्ग येथे १० मार्चला सकाळी गुटखा विक्री करणार्या अजित आप्पा गावस, एजाज निस्सार आणि नारायण जयवंत चांदेरकर या तिघांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर या तिघांना न्यायालयात उपस्थित केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी बजावली. या तिघांकडून २ सहस्र ५०० रुपयांचा गुटखा कह्यात घेण्यात आला.