हे गुरुदेवा, तुमचाच आधार या पामराला ।
निघालो आम्ही गुरुदेवांच्या आश्रमातून परतूनी ।
भरून आले नयन भावाश्रूंनी ॥ १ ॥
किती थोरवी सांगावी श्री गुरूंची ।
किती काळजी घेतात ते सर्व साधकांची ॥ २ ॥
गुरुदेव म्हणजे अंशात्मक अवतार साक्षात् श्रीविष्णूचा ।
जन्म घेतला भूवरी उद्धार करण्या भक्तजनांचा ॥ ३ ॥
सप्तर्षी आणि महर्षि वंदन करती जयांना ।
असे गुरुदेव लाभले आम्हा सर्वांना ॥ ४ ॥
कोटी कोटी नमस्कार करतो त्या श्रीकृष्णाला ।
कारण त्यानेच भेटवले गुरुदेवांशी आम्हाला ॥ ५ ॥
गुरुदेवा, नाही सहन होणार हा दुरावा मला ।
तुम्हीच लवकर बोलावून घ्या रामनाथीला ॥ ६ ॥
हे गुरुदेवा, तुमचाच आधार आहे या पामराला ।
मला घ्या शीघ्रतेने तव चरणी ॥ ७ ॥
मायेपासून मला विरक्त करा ।
जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून लवकर मुक्त करा ॥ ८ ॥
– गुरुसेवक, डॉ. शैलेश पाटील, कोल्हापूर (जून २०१७)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |