हिंदूंनो, शिवाच्या उपासनेविषयी धर्मशिक्षण जाणून घ्या !
बहुतांश हिंदूंना देवता, सण आदींविषयी आदर आणि श्रद्धा असते; परंतु बहुतेकांना त्यांच्या उपासनेमागील धर्मशास्त्र ठाऊक नसते. शिवाच्या उपासनेत अंतर्भूत असलेल्या विविध कृती करण्याच्या योग्य पद्धती आणि त्यांचे शास्त्र यांविषयी समाजाला धर्मशिक्षण देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणे, ही शिवभक्तांसाठी काळानुसार समष्टी साधना आहे.