लाभावेत आपले प्रीतीमय आशीष आम्हा साधकांना ।
शब्द नसती, ही आहेत श्वासरूपी सुमने ।
अर्पू किती ही आपुल्या चरणी कृतज्ञताभावाने ॥ १ ॥
लेणे असे लाभले मजला आपुल्या सेवेचे ।
साठवून ठेविले मी माझ्या अंतःकरणी ते ॥ २ ॥
बाबा (टीप), तुमच्या नसण्याने पोकळी हो वाटते ।
संतांच्या अन् ईश्वराच्या चैतन्याने ती थोडी भरूनी येते ॥ ३ ॥
बाबा, दिलात तुम्ही ठेवा आपुल्या ज्ञानाचा मजला ।
कृतज्ञतेने ल्यायले जीवनी मी मौल्यवान या साजाला ॥ ४ ॥
कर्माचे साधन राहिले आहे फेडाया ।
कशी होऊ उतराई गुरुराया (परात्पर गुरु डॉक्टर) या कृपेला ॥ ५ ॥
निःशब्द मनीचे बोल अर्पिते बाबा आपुल्या चरणा ।
आहेत आशीर्वाद या जिवावर नेण्या पुढच्या मार्गाला ॥ ६ ॥
बाबा, मुक्त करा हो, माझ्या या मायेच्या बंधना ।
शुद्ध करा हो, आता अंतरीच्या दलदलीला ॥ ७ ॥
प्रार्थिते आजच्या दिनी आपुल्या चरणा ॥
लाभावेत आपले प्रीतीमय आशीष आम्हा साधकांना ॥ ८ ॥
टीप : परात्पर गुरु पांडे महाराज
– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.३.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |