पुणे येथील सेवा विकास को-ऑपरेटीव्ह बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक
पुणे, १० मार्च – पिंपरी-चिंचवडमधील सेवा विकास को-ऑपरेटीव्ह बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांना अधिकोषातील २३८ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ७ मार्चला रात्री अटक केली. न्यायालयाने मुलचंदानी यांना १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आर्.टी.ओ.) बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हाही नुकताच मुलचंदानी यांच्यावर नोंद झाला होता.
पिंपरी बाजार पेठेतील सिंधी समाज आणि व्यापार्यांची बँक म्हणून सेवा बँक प्रसिद्ध आहे. त्यांनी वर्ष २०१० ते २०१९ पर्यंत २३८ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मुलचंदानी यांचे अनेक राजकीय नेत्यांसह चित्रपट सृष्टीतील अनेकांशी जवळचे संबध आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, ४२० आणि इतर अतिरिक्त कलमाअंतर्गत मूलचंदानी यांना चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांमुळे त्यांना तात्पुरत्या स्वरूपात एम्.सी.आर्.मध्ये ठेवण्यात आले आहे.