भारत पाकिस्तानला देणार साडेचार कोटी कोरोना लसीचे डोस
भारताची गांधीगिरी ! याच्या बदल्यात भारताला जिहादी आतंकवाद, हिंदूंचा वंशसंहार, सीमेवर गोळीबार आदी गोष्टी ‘भेट’ मिळणार आहेत. यात कोणता पालट होईल, याची अपेक्षा करता येणार नाही !
नवी देहली – ‘द ग्लोबल अलायंस फॉर वैक्सीन अँड इम्यूनायजेशन (जीएव्हीआय) या संघटेच्या अंतर्गत भारत पाकिस्तानला कोरोना लसीचे ४ कोटी ५० लाख डोस देणार आहे. ही संघटना जगातील गरीब देशांना कोरोना लस देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. यानुसार पाकिस्तानला कोरोना लसीचे पहिले पार्सल मार्चच्या मध्यावर पोचवले जाणार आहे. जूनपर्यंत १ कोटी ६० लाख डोस पोचवले जाणार आहेत.