भाजप कामगार आघाडीच्या वतीने विविध प्रश्नांसाठी साहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन !
सांगली – सांगली जिल्हा भारतीय जनता पक्ष कामगार आघाडीच्या वतीने साहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांविषयी निवेदन देण्यात आले. या वेळी बांधकाम कामगारांच्या अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. या वेळी भाजप कामगार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मोहिते, भाजप कामगार आघाडी जिल्हााध्यक्ष प्रियानंद कांबळे, शैलजा कोळी, ललिता कांबळे, प्रीती काळे, अंकुश ऐवळे यांसह अन्य उपस्थित होते.