मनसुख हिरेन यांच्या २ भ्रमणभाषची वेगवेगळी ठिकाणे सापडली
ठाणे – मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आतंकवादविरोधी पथकाच्या अन्वेषणातून वर्तवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मनसुख हिरेन यांच्या एका भ्रमणभाषचे ठिकाण (लोकेशन) वसईतील मांडवी भागात सापडले आहे, तर दुसर्या भ्रमणभाषचे ठिकाण वसईजवळील तुंगारेश्वर येथे सापडले आहे.
सचिन वझे यांचा जबाब नोंदवला
या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने सचिन वाझे यांचा जबाब नोंदवला आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्कॉप्रिओ गाडीमध्ये स्फोटके आढळण्याच्या प्रकरणाचे वाझे अन्वेषण करत होते. सचिन वाझे हिरेन यांना ठाणे येथून मुंबईला घेऊन आले होते. या सर्व पैलूंच्या अनुषंगाने वाझे यांची चौकशी करण्यात आली असल्याचे समजते.