हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’ याविषयी ‘ऑनलाईन’ व्याख्यान !

पुणे (वार्ता.) – ६ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्रजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सर्वच स्तरांतून उत्तम प्रतिसाद मिळाला. यानंतर सभेला उपस्थितांंपैकी काही जिज्ञासूंनी समितीच्या कार्यात सहभागी होण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. या जिज्ञासूंसाठी ७ मार्च या दिवशी दुपारी २ ते ३ या वेळेत ‘लव्ह जिहाद’ या विषयासंदर्भात ‘ऑनलाईन’ व्याख्यान घेण्यात आले. समितीचे श्री. पराग गोखले यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. सर्वांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रतिदिन किमान ५ जणांना ‘लव्ह जिहाद’संदर्भात जागृत करण्याचे ध्येय घेतले. त्यानंतर येत्या काही दिवसांत अशाच प्रकारे ‘हलाल इकॉनॉमी’ या विषयावरही ‘ऑनलाईन’ व्याख्यान घेऊन सर्वांमध्ये जागृती करण्याचे ठरवण्यात आले.