‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीच्या फेसबूक पेजवरून हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित
सोलापूर, ९ मार्च (वार्ता.) – जागतिक महिलादिनानिमित्त ‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीने ८ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित केली. मुलाखत समितीच्या कु. वर्षा जेवळे यांनी घेतली. ही मुलाखत ‘झक्कास मराठी’च्या फेसबूक पेजवरून ‘लाईव्ह’ करण्यात आली. ‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीचे संपादक श्री. अर्जुन फंड यांनीही मुलाखतीसाठी पुष्कळ सहकार्य केले.
मुलाखतीमध्ये महिलांचे शारीरिक आणि मानसिक सक्षमीकरण होण्यासाठी काय करावे, महिलांमधील वाढत्या निराशेचे निराकरण कसे करावे, शनीशिंगणापूर येथील शनी मंदिर किंवा स्वामी अय्यप्पा मंदिरात महिलांनी प्रवेश करणे योग्य कि अयोग्य, तसेच यामागील धर्मशास्त्रीय दृष्टीकोन कोणता, हिंदु धर्मात महिलांना दुय्यम स्थान आहे का, सध्या महिला नोकरी, उद्योग, सामाजिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रांत प्रगती करत आहेत त्यांचा खर्या अर्थाने विकास होण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
विशेष
१. ‘झक्कास मराठी’चे ६८ सहस्र ५८१ फॉलोअर्स असून या ‘ऑनलाईन’ मुलाखतीचा १ सहस्र ३०० हून अधिक जणांनी लाभ घेतला, तर १२१ जणांनी ही मुलाखत ‘शेअर’ केली आहे.
२. ‘महिलांचे प्रश्न आणि त्यावरील उपाय याविषयी विशिष्ट टप्प्यापर्यंतच चर्चा होते. त्यामुळे त्याचा विशेष परिणाम होत नाही; मात्र आजच्या चर्चेमध्ये प्रश्नांतील मुख्य सूत्रांवर चर्चा झाली आणि उपाययोजनांची माहिती मिळाली’, अशी प्रतिक्रिया एका महिलेने पोस्ट केली आहे.
खालील लिंकवर मुलाखत उपलब्ध !
https://m.facebook.com/story.php?story_fbid=276075903927859&id=415484615942882