मुख्याध्यापकांकडून १० वीमधील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार
असे शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? अशा शिक्षकांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
सातारा, ९ मार्च (वार्ता.) – महाबळेश्वर (जिल्हा सातारा) येथील बाजारपेठेतील एका शाळेतील मुख्याध्यापक दिलीप रामचंद्र ढेबे यांनी शाळेतील १० वीमधील एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून ढेबे यांना कह्यात घेतले आहे.
याविषयी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, मार्च २०२० ते मार्च २०२१ या काळामध्ये शाळेतील मुख्य सभागृह आणि प्रयोगशाळा या ठिकाणी ढेबे यांनी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले. पोलीस अधिक तपास करत आहेत.