महाशिवरात्रीच्या दिवशी होणार्‍या पवित्र (शाही) स्नानानिमित्त अतिरिक्त रेल्वे गाड्यांची सुविधा नाही !

हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये ११ मार्च या दिवशी महाशिवरात्रीला होणार्‍या पवित्र (शाही) स्नानासाठी अतिरिक्त रेल्वे गाड्या चालवण्यात येणार नाही, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने घोषित करण्यात आले आहे. या स्नानानिमित्त गर्दी झाल्यास नियमितच्या गाड्यांना केवळ ४ अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. यापूर्वीच्या ४ पर्व स्नानांसाठीही अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या नव्हत्या; मात्र ११ मार्चच्या पवित्र स्नानाला संत आणि संन्यासी आखाडे उपस्थित असणार आहेत. त्यामुळे अधिक गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवासाच्या ७२ घंट्यांपूर्वी कोरोनाची ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी करणे आवश्यक
आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सी. रविशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.