दक्षिण आफ्रिकेमध्ये हिंदु संघटनांकडून जागतिक शांततेसाठी प्रार्थनासभेचे आयोजन
हिंदू सहिष्णु असल्यामुळेच ते अशा प्रकारच्या प्रार्थनासभांचे आयोजन करतात !
जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) – येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘वर्ल्ड हिंदु फाऊंडेशन’, ‘द वर्ल्ड हिंदु पंडित ऑर्गनायजेशन’ आणि ‘द प्रोविंशियल गोटेंग हिंदूज’ या ३ हिंदु संघटनांनी जागतिक शांततेसाठी प्रार्थनासभेचे आयोजन केले होते. यामध्ये भारत, मलेशिया, सिंगापूर, केनिया, जर्मनी, अमेरिका, इंडोनेशिया, मॉरिशस आणि नायजेरिया येथील पुजारी आणि अन्य हिंदू यांनी मंत्र म्हटले. तसेच हिंदी, तमिळ, तेलुगु, गुजराती, बंगाली, मराठी आणि संस्कृत भाषेमध्ये भक्तीगीते गायिली. याचे यू ट्यूब आणि फेसबूक यांवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.