५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सांगली येथील चि. देविका निनाद सावंत (वय ३ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. देविका निनाद सावंत ही आहे !
‘आमच्या सांगली येथील सदनिकेच्या समोर चि. देविका निनाद सावंत ही बालिका रहाते. मी घरी गेले असतांना मला देविकाची काही वैशिष्ट्ये लक्षात आली. ती येथे दिली आहेत. १०.३.२०२१ या दिवशी चि. देविकाचा तिसरा वाढदिवस आहे.
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
चि. देविका सावंत हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभेच्छा !
१. मधुर आणि लाघवी बोलणे
‘देविकाचे बोलणे निर्मळ आणि मधुर आहे. ती कुणाशीही सहज संवाद साधते. तिचे बोलणे लाघवी असल्याने समोरचाही तिच्याकडे लगेच आकर्षित होतो. आमच्या घरी नेहमी येणार्या व्यक्ती घरात आल्यावर प्रथम देविकाविषयी विचारतात.
२. सांगितलेले ऐकणे
२ अ. भीती वाटत असतांना ‘प.पू. भक्तराज महाराज सोबत आहेत’, असे सांगितल्यावर किंवा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ जप करण्यास सांगितल्यावर तो करणे : आमची आणि त्यांची सदनिका समोरासमोर असल्याने तिचे सारखे या घरातून त्या घरात येणे-जाणे चालू असते. काही वेळा ती एकटी घरी जाण्यास घाबरते. त्या वेळी मी तिला सांगितले, ‘‘प.पू. भक्तराज महाराज आहेत ना ! मग तू घाबरू नकोस.’’ मग ती न घाबरता घरी जाते. कधी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत घरी जा’, असे म्हटल्यावर ती मोठ्याने नामजप करत घरी जाते.
२ आ. देविका कधी हट्ट करते. त्या वेळी तिला समजावून सांगितले, तर ती लगेच ऐकते आणि त्यानंतर ती त्या संदर्भात पुन्हा हट्ट करत नाही.
३. कोणत्याही प्रश्नाला धीटपणे आणि चपखल उत्तर देणे (हजरजबाबीपणा)
अ. प्रतिदिन मी देवपूजा करतांना देविका माझ्या शेजारी येऊन बसते. पूजेच्या सिद्धतेतील प्रसादासाठी ठेवलेली साखर तिला हवी असते. त्या वेळी आम्हा दोघींमध्ये होत असलेले संभाषण,
देविका : मी साखर खाऊ का ?
मी : देवाला नैवेद्य दाखवला की, तू साखर खा.
देविका : मीच ‘देवा’ आहे. मग मला साखर द्या. (देविकाची आई कधी कधी तिला ‘देवा’ असे म्हणते.)
आ. ती एकाच वेळी अनेकांच्या प्रश्नांना अतिशय चपखल आणि योग्य उत्तरे देते. एकाच वेळी अनेक जण प्रश्न विचारतात, तर ‘कसे बोलू’, असे तिचे कधीच होत नाही. अगदी ‘कोविड’, ‘मास्क’ या संदर्भातील प्रश्न विचारल्यावरही तिने योग्य उत्तर दिले.
४. साधकांचा सहवास हवासा वाटणे
ऑक्टोबर २०२० मध्ये मी घरी गेल्यानंतर देविका सकाळी आणि दुपारी झोपून उठल्यानंतर प्रथम आमच्या घरात येऊन ‘मी घरात आहे ना’, हे पहात असे. ती मला शोधत असे.
५. सात्त्विकतेची आवड
अ. देविका सकाळी आमच्या घरी आल्यानंतर देवघरातील देवांना नमस्कार करते आणि ‘माझ्याकडे लक्ष ठेवा’, अशी प्रार्थना करते.
आ. तिला अष्टगंध लावायला अतिशय आवडते. दिवसातून ४ – ५ वेळा ती कापराचे उपाय करते. तिला कापराचे उपाय करायला आवडतात.
इ. ती ‘शुभं करोति’ व्यवस्थित म्हणते. तिला ‘भीमरूपी महारुद्रा’ हे मारुतिस्तोत्रही पाठ झाले आहे.
ई. तिला गोग्रास घालायला आवडतो. ती प्रतिदिन माझ्या भावासमवेत गोग्रास घालायला जाते आणि गायीच्या पाडसाला घास भरवते.
६. सूक्ष्मातील कळणे
एके दिवशी देविका पुष्कळ दंगा करत होती. त्यामुळे मी तिला म्हटले, ‘‘देवबाप्पा तुझ्याकडे पहातो आहे बरं का. दंगा करू नकोस.’’ त्यावर ती आमच्या देवघरात लावलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रासमोर जाऊन उभी राहिली. त्यांच्या छायाचित्राकडे पाहून तिला काय वाटले कुणास ठाऊक ! ती त्या छायाचित्राच्या बाजूने फिरून पाहू लागली. (आपण प.पू. महाराजांच्या छायाचित्राचा प्रयोग करतांना जसे ‘छायाचित्राच्या सर्व बाजूंनी पाहून काय जाणवते ?’, ते पहातो, अगदी त्याप्रमाणे तिने केले.) नंतर ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, ‘‘आत्या, ते (प.पू. महाराज) माझ्याकडे पहातात. मला ते आवडतात.’’ एरव्हीही देविका प.पू. महाराजांच्या छायाचित्राकडे पाहून म्हणते, ‘‘ते माझ्याकडे पहातात.’’
स्वभावदोष : हट्टीपणा (मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे) आणि भित्रेपणा.’
– कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.२.२०२१)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |