पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या ६ मासांत २३७ गुन्हेगारांना अटक
पुणे, ९ मार्च – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामध्ये गुन्हेगारी टोळ्यांना गजाआड करण्यासमवेतच पैशांसाठी गंभीर गुन्हे करणार्या सराईतांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका), ‘एम्.पी.डी.ए.’, तसेच तडीपारीची कारवाई करून गेल्या ६ मासांत जवळपास २३७ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. (गुन्हेगारांवर कडक कारवाई करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे. त्याचा विसर पोलिसांना अन्य वेळी पडलेला असतो का, असा प्रश्न सामान्यांच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक)