प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ आणि पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांचे ट्विटर खाते बंद !
|
|
नवी देहली – प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ आणि फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांना कोणतीच पूर्वकल्पना न देता ट्विटरने त्यांचे खाते बंद केले आहे. या विरोधात हिंदुत्वनिष्ठांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यासाठी #ISupportGautier या हॅशटॅगने ९ मार्च या दिवशी ट्विटर ट्रेंडही करण्यात आला. ‘गरुडा प्रकाशन’ नावाच्या संस्थेने ५ मार्च या दिवशी केंद्रीय स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते फ्रान्सुआ गोतिए लिखित पुस्तक ‘ऍन एन्टायर्ली न्यू हिस्ट्री ऑफ इंडिया’ (भारताचा एकदम नव्या पद्धतीने लिहिलेला इतिहास) प्रकाशित केले. या पुस्तकातून गोतिए यांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीला आव्हान दिले असून पाश्चिमात्य देशांनी भारताचा इतिहास कशा प्रकारे कलंकित आणि कावेबाजपणे खोटा प्रसारित केला, यावर आसूड ओढले आहे. यामुळेच ट्विटरने ही कारवाई केल्याचे मत गरुडा प्रकाशनचे अध्यक्ष श्री. संक्रांत सानू यांनी व्यक्त केले आहे.
Just days after we launched Francois Gautier’s book “An Entirely New History of India” questioning colonial biases in history, his Twitter handle @fgautier26 has been deleted without any explanation.
Level of censorship is unbelievable! @ARanganathan72 #ISupportGautier https://t.co/X5jtw3zNwm
— Sankrant Sanu सानु संक्रान्त ਸੰਕ੍ਰਾਂਤ ਸਾਨੁ (@sankrant) March 9, 2021
गोतिए यांनी याआधीही काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद, औरंगजेबाची क्रूरता आदी सत्य इतिहास जागतिक व्यासपिठावर परिणामकारकणे मांडला होता.
Sheer Hypocrisy !
Those who give lessons of #FreedomOfSpeech to the largest democracy to tolerate forces who oppose the government on one hand, curbs the voices of @fgautier26 on the other?
Double standards, isn’t it ?#ISupportGautier https://t.co/1srmWQfmmL
— Sanatan Prabhat (@sanatanprabhat) March 9, 2021
@Twitter Censorship ?
Deleted handle of Renowned Journalist Francois Gautier ?
Anyone who is telling Truth is Rightist & will be banned ?
Restore Twitter handle.. @fgautier26 @HinduJagrutiOrg@meenakshisharan@jkd18 @KapilMishra_IND#ISupportGautier pic.twitter.com/HbDRpzSGyJ— 🚩 Ramesh Shinde 🇮🇳 (@Ramesh_hjs) March 9, 2021
फ्रान्सुआ गोतिए लिखित पुस्तक ‘ऍन एन्टायर्ली न्यू हिस्ट्री ऑफ इंडिया’चा संक्षिप्त परिचय !
आज प्रचलित असलेला भारतीय इतिहास हा पाश्चात्त्य इतिहासकार आणि त्यांचे समर्थक भारतीय विद्वान यांनी ख्रिस्ती धारणेनुसार ६ सहस्र वर्षांचाच मानवी इतिहास असल्याचे गृहीत धरून लिहिला आहे. या इतिहासकारांची गृहितके आणि तत्त्वे यांना समर्पक होईल, अशा प्रकारे भारतातील अनेक ऐतिहासिक तथ्यांना पुष्कळ विलंबाने घडल्याचे दाखवण्यात आले आहे. ‘आर्य आक्रमणा’चा खोटा इतिहासही त्यात आलाच ! तसेच वेदांमध्ये सरस्वती नदीचा ६० हून अधिक वेळा उल्लेख असूनही या महाशयांनी तिला ‘दंतकथा’ असल्याचे म्हणत दुष्प्रचार केला आहे. राजा अशोकने कलिंगच्या युद्धानंतर प्रायश्चित्त म्हणून बौद्ध धर्म स्वीकारल्याचा खोटेपणाही या पुस्तकातून फ्रान्सुआ गोतिए यांनी समोर आणला आहे. एकूण पहाता, या पुस्तकाद्वारे गोतिए यांनी भारतीय इतिहास नव्याने लिहिला असून प्रत्येक मोठी घटना वैज्ञानिक, भाषिक आणि अनुवांशिक शोधांच्या आधारे सादर केली आहे. या माध्यमातून भारतीय इतिहास पुष्कळ प्राचीन असल्याचे त्यांनी समोर आणले आहे. |