महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाचा नामजप का करावा ?
महाशिवरात्रीला शिवतत्त्व नेहमीपेक्षा १,००० पटीने कार्यरत असते. त्याचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप अधिकाधिक आणि भावपूर्ण करावा. |
महाशिवरात्रीच्या दिवशी ‘बं’या बीजमंत्राचा जप केल्याने होणारे लाभ !‘महाशिवरात्रीला देशी तुपाचा दिवा प्रज्वलित करून ‘बं’ या बीजमंत्राचा सव्वालक्ष जप केल्यास पुष्कळ हितकारी आहे. हा मंत्र शुद्ध आणि सात्त्विक भावनांना सफल करण्यात मोठे साहाय्य करतो. शक्यतो एकांतात महादेवाची विधीवत पूजा करावी किंवा मानस पूजा करावी. सव्वालक्ष वेळा ‘बं’ चे उच्चारण हे निरनिराळे यश मिळवून देण्यात साहाय्य करते. सांधेदुखी, वमन (उलटी), कफ, वायूजन्य आजार आणि मधुमेह इत्यादींमध्ये याचा लाभ होतो. हा बीजमंत्र स्थूल शरिरास तर लाभ करून देतोच, त्याचसमवेत सूक्ष्म आणि कारणदेह यांवरही स्वतःचा दिव्य प्रभाव पाडतो.’ (मासिक ‘लोक कल्याण सेतू’ (वर्ष ७ वे, अंक ८०)) |