कु. रजनीगंधा कुर्हे यांना शिवासंदर्भात भजन ऐकतांना भगवान शिवाच्या तिसर्या नेत्रासंदर्भात आलेली अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे
११ मार्च या दिवशी महाशिवरात्र आहे, त्यानिमित्ताने…
१. भजन ऐकतांना स्वतःच्या कपाळाच्या मध्यस्थानी तिसरे नेत्र असल्याचे जाणवून ‘त्या नेत्रात अनेक ब्रह्मांडे, ग्रहमालिका आणि सूर्यमंडल आहेत’, असे दिसणे
‘७.१०.२०२० या दिवशी मी भगवान शिवाच्या संदर्भातील भजन ऐकत होते. भजन ऐकतांना माझे डोळे आपोआप मिटले गेले आणि माझे लक्ष माझ्या कपाळाच्या मध्यस्थानी जाऊन तिथे मला तिसरे नेत्र असल्याचे जाणवले. ‘त्या नेत्रात काय सामावले असावे ?’, असा विचार माझ्या मनात आला आणि मला त्या नेत्रात ‘अनेक ब्रह्मांडे, ग्रहमालिका आणि सूर्यमंडल आहेत’, असे दिसले. तेथील प्रकाश दिव्य आणि अती शीतल जाणवला.
२. भगवान शिवाच्या तिसर्या नेत्राचे माहात्म्य !
त्या वेळी ‘भगवान शिवाचे तिसरे नेत्र म्हणजे संपूर्ण विश्वाला सामावून घेणारे स्थान असून यायोगेे शिव भूत, भविष्य आणि वर्तमान या सर्व काळांचे ज्ञान ठेवू शकतो’, असे मला वाटले.
३. अंतर्यामी वास करणार्या ईश्वराला पहाण्यासाठी स्थूल नेत्राची नाही, तर अंतर्चक्षूंची आवश्यकता असल्याचे ध्यानी येणे
या वेळी साधनेच्या दृष्टीने आणखी एक सूत्र लक्षात आले. मनुष्य स्थूल नेत्रांनी बाह्य गोष्टी पाहू शकतो; परंतु अंतर्यामी वास करणार्या ईश्वराला पहाण्यासाठी त्याला स्थूल नेत्र बंद करून आतील अंतर्चक्षूंना उघडावे लागते. त्या वेळी अंतरी वास करणार्या ईश्वराशी तादात्म्य पावता येते.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले त्रिमूर्ती ब्रह्मा-विष्णु-महेश स्वरूप असल्याची अनुभूती येणे
ही अनुभूती टंकलिखित करतांना संगणकाच्या पडद्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र आले आणि त्यांच्या कपाळावर मला त्रिनेत्राचे दर्शन झाले. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टर केवळ विष्णुस्वरूप नाहीत, तर शिवस्वरूपही आहेत आणि ते केवळ शिवस्वरूप नाहीत, तर ब्रह्मस्वरूपही आहेत’, असे माझ्या लक्षात आले; कारण सनातनची ग्रंथसंपदा ही जणू पाचवा वेदच असल्याने त्याची निर्मिती परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी कलियुगातील मानवजातीसाठी केली आहे.
अशा त्रिमूर्तीस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अनंत काळासाठी अपूर्णच राहील; मात्र आम्हा साधकांना या कृतज्ञतेच्या ऋणांखाली रहाणे आवडेल; कारण गुरूंच्या ऋणांतून कधीच उतराई होऊ शकत नाही.
– कु. रजनीगंधा कुर्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१०.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |