महिलांनो, सक्षम होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा
‘धर्माचरण, धर्माभिमान यांचा अभाव आणि पाश्चिमात्त्यांचा प्रभाव महिला आणि मुली यांवर झाला आहे. हिंदु स्त्रियांना कुंकू लावण्याची, बांगड्या घालण्याची लाज वाटते. घट्ट, तोकडे कपडे घालणे, केस मोकळे सोडणे म्हणजे ‘आम्ही आधुनिक आहोत’, असे मुलींना वाटते. ‘लव्ह जिहाद’चे संकट तर आता दारापर्यंत येऊन पोचले आहे. हे सर्व रोखण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक आहे. यासाठी समितीच्या वतीने विनामूल्य स्वरक्षण प्रशिक्षण आणि धर्मशिक्षणही दिले जाते. सर्व भगिनींनी याचा लाभ घ्यावा !’