‘संतांचा आशीर्वाद, हेच उपचार केल्याचे बिल !’, असे प.पू. दास महाराज यांना सांगणारे कुडाळ येथील नेत्रतज्ञ डॉ. संजय सामंत !
‘९.१०.२०१९ या दिवशी डॉ. संजय सामंत यांनी प.पू. दास महाराज यांच्या एका डोळ्याच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली. याविषयी प.पू. दास महाराज यांनी त्यांचे डॉ. सामंत यांच्याशी झालेले संभाषण सांगितले. प.पू. दास महाराज यांनी त्यांना ‘देयक (बिल) किती ?, ते विचारले.
तेव्हा ते म्हणाले, ‘‘काही नाही. बिलाचे पैसे शाश्वत टिकणार नाहीत. तुम्ही दिलेला आशीर्वाद कायमचा टिकेल ! परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला भरभरून दिले.’’ त्यावर प.पू. दास महाराजांनी विचारले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांनी तुम्हाला भरभरून काय दिले ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आम्हाला तुमच्यासारखे भरपूर संत मिळाले आहेत !’’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले