मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने वडिलांसह आजोबांचा खून करून आत्महत्या केली
समाजाला साधनेला न लावल्याचे दुष्परिणाम !
मुंबई – मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने वडिलांसह आजोबांचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली आहे. मुलुंड पश्चिमेकडील वसंत ऑस्कर सोसायटीत ही घटना घडली. सुरेश मांगले (वय ८४ वर्षे), मिलिंद मांगले (वय ५५ वर्षे) आणि शार्दूल मांगले (वय २० वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. शार्दूलने आधी वडील आणि आजोबा यांचा चाकूने खून केला. नंतर स्वत: इमारतीवरून उडी मारली.