नरवीर तानाजी मालुसरे यांचा ३५१ वा शौर्यदिन आणि पुण्यतिथी सोहळा साजरा
रायगड – पोलादपूर तालुका उमरठ या ठिकाणी ‘नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट, उमरठ’ यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे नरवीर तानाजी मालुसरे यांचा ३५१ वा शौर्यदिन आणि पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी आमदार भरतशेठ गोगावले यांनी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. या वेळी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज रायबा मालुसरे यांना शिक्षणासाठी दोन लाख रुपये कार्यक्रमाच्या ठिकाणी देण्यात आले. खासदार श्रीकांत शिंदे यांना नरवीर तानाजी मालुसरे पुरस्कार देण्यात आला.
या प्रसंगी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष पारधी, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, पोलादपूर नगरपरिषद नगराध्यक्ष बचू पवार, पंचायत समिती सदस्य यशवंत कासार, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे तसेच शिवभक्त उपस्थित होते.