पुणे येथील पोलीस निरीक्षकासह तिघांना १ लाख रुपयांची लाच घेतांना अटक !
पोलीस लाचखोर असणे, हे पोलीस खात्याला लज्जास्पद ! अशा पोलिसांवर कठोर कारवाई करावी !
पुणे, ८ मार्च – जामीन अर्जावरील बाजूने म्हणणे देण्यासाठी एकाकडून १ लाख रुपयांची लाच घेतांना कामशेत पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक अरविंद चौधरी यांच्यासह साहाय्यक निरीक्षक आणि शिपाई याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७ मार्च या दिवशी सापळा रचून पकडले आहे. जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी पोलीस निरीक्षक चौधरी यांच्यासह साहाय्यक निरीक्षक कदम यांनी तक्रारदाराकडे ५ लाख रुपयांची लाच मागितली होती.