श्रीक्षेत्र औदुंबर (जिल्हा सांगली) येथे देशपांडे कुटुंबियांकडून चांदीची प्रभावळ श्रींच्या चरणी अर्पण !
औदुंबर (जिल्हा सांगली), ८ मार्च (वार्ता.) – ६ मार्च या दिवशी नाशिक येथील कै. दत्तात्रय गोपाळ देशपांडे आणि कै. (सौ.) सुमन दत्तात्रय देशपांडे यांच्या स्मरणार्थ पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. राजेंद्र देशपांडे यांनी तीर्थक्षेत्र औदुंबर येथे गाभार्यासाठी श्रींच्या चरणी ३० किलोची प्रभावळ अर्पण केली.
या मंगलप्रसंगी श्री. राजेंद्र देशपांडे यांच्यासह त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मेधा, त्यांची मुले निकीत, शिरीना, इशानी हे उपस्थित होते. गंध, पुष्प अक्षता लावून प्रभावळीचे पूजन करण्यात आले. सदर कमान पुणे येथील कारागीर गणेश बालवडकर आणि नितीन करडे यांनी कोणत्याही यंत्राचा वापर न करता दीड मासात सिद्ध केली. याचे पौरोहित्य औदुंबर येथील पुरोहितांनी केले. या वेळी दत्त सेवाभावी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.