मालेगावात कोरोनासंबंधी नियम मोडत सभा घेणारे माजी आमदार असिफ शेख यांच्यासह दोन आयोजकांवर गुन्हा नोंद
कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या मालेगावमध्ये पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढत असूनही आणि कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करत असतांना एका माजी आमदाराने सर्व नियम पायदळी तुडवणे, हे लोकप्रतिनिधींसाठी लज्जास्पद आहे !
मालेगाव (जिल्हा- नाशिक) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असतांनाही मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी पुढील राजकीय वाटचालीसाठी रौनकाबाद येथे ६ मार्चला रात्री जाहीर सभेचे आयोजन केले. या सभेला त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी सामाजिक अंतर पाळणे आणि कोरोनाचे अन्य नियम यांचा फज्जा उडाला. अनेकांनी मास्क घातला नव्हता. पोलिसांनी माजी आमदार असिफ शेख यांच्यासह दोन आयोजकांवर गुन्हा नोंद केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच पोलिसांनी सभेला अनुमती नाकारली असतांनासुद्धा आसिफ शेख यांनी हटवादी भूमिका घेत जाहीर सभा घेतल्याचे कळते.