यवतमाळ जिल्हा कोरोनाग्रस्त असतांनाही माहुर येथे सोनापीरबाबा येथील संदली येथे कार्यक्रम साजरा !
महसूल आणि पोलीस प्रशासन यांचा ढिम्म कारभार !
यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक यांनी अधिक सतर्क राहून सर्व धर्मांतील उत्सवांना बंदी घातली घातली, तरी हे उत्सव कुणी साजरे करत आहे का ?, हे कटाक्षाने पाहिले पाहिजे. सोनापीरबाबा यात्रेला बंदी असतांनाही तेथे कार्यक्रम कसा साजरा झाला ? हिंदूंच्या उत्सवावर बंदी घालण्यास मागेपुढे न पहाणारे सुस्त प्रशासन सोनापीरबाबा येथे कार्यक्रम साजरा करणार्यांवर कारवाई का करत नाही ? कायदा केवळ हिंदूंना आहे का ?
नांदेड – ५ मार्च या दिवशी सोनापीरबाबा दर्गा यात्रा रहित झाल्याचेे दर्गा प्रशासनाद्वारे घोषित केले होते; मात्र या दिवशी सायंकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत पोलिसांच्या निगराणीत यवतमाळ या कोरोनाग्रस्त जिल्ह्यातील सहस्रो नागरिकांनी सोनापीरबाबा येथील संदल येथे डी.जे.च्या तालावर नाचत कार्यक्रम साजरा केला.
येथील जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी गेल्या पौर्णिमा यात्रेत माहुर तीर्थक्षेत्रावर पोलीस अधीक्षकासह स्वतः येऊन यवतमाळ येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी केली होती. सोनापीरबाबा येथील या घटनेच्या पार्श्वभूमीवर माहुर पोलिसांनी ८ दिवसांपूर्वीच बंजारा समाजाचे आराध्य दैवत आणि समस्त हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवास बंदी हुकूम का बजावण्यात आला होता ? असा संतप्त प्रश्न संत सेवालाल महाराज जयंती उत्सवाचे अध्यक्ष आकाश जाधव आणि छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सवाचे अध्यक्ष राज कदम पाटील यांनी उपस्थित केला आहे.
मासाभरापूर्वी ‘माहुर शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही’, अशी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य अधिकारी शेखी मिरवत होते; मात्र पौर्णिमा यात्रेत आणि सोनापीरबाबाच्या जत्रेत कोरोना रुग्ण सापडल्याने पोलीस, महसूल, आरोग्य आणि नगर पंचायत अधिकार्यांचे पितळ उघडे पडले आहे.
खासदार हेमंत पाटील, आमदार भीमराव केराम आणि सर्व जिल्हा परिषदेतील सदस्यांनी जिल्हा प्रशासनाकडे संबंधित दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, तसेच सर्वच धर्मांतील नागरिकांना समान न्याय हक्काची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.