कर्नाळा बँक आर्थिक घोटाळा प्रकरणाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष का ? -आमदार प्रशांत ठाकूर यांचा विधीमंडळात प्रश्न
पनवेल (मुंबई) – कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ५१२ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणाकडे राज्य सरकार दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात उपस्थित केला. या वेळी प्रशांत ठाकूर म्हणाले की, या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून सर्व चौकशा झाल्या आहेत; मात्र अद्यापपर्यंत एकाही संचालकांना, तसेच अध्यक्ष विवेक पाटील यांना अटक तर दूर यातील एकाही व्यक्तीवर अद्याप कारवाई झालेली नाही. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा नेमका काय तपास करत आहेत ?