शिर्डी येथे दर्शनासाठी येणार्या भाविकांकडून प्रवेश कर वसुलीचा ठराव
नगरपंचायतीच्या निर्णयाला शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध
नगर शिर्डी देवस्थानाला येणार्या भाविकांकडून प्रवेशकर वसुलीचा ठराव मांडण्यात आला आहे. नगरपंचायतीने मांडलेल्या या ठरावाला शिवसेना, तसेच राष्ट्रवादी पक्षाकडून विरोध होत आहे. दळणवळण बंदीपूर्वी गावाच्या स्वच्छतेसाठी शिर्डी देवस्थानाकडून ४२ लाख रुपये स्वच्छता निधी देण्यात येत होता. दळणवळण बंदी नंतर मात्र शिर्डी देवस्थानकडून हा निधी अचानक बंद करण्यात आला. त्यामुळे स्वच्छता कर्मचार्यांचे वेतन थकित झाले. याचा अतिरिक्त भार नगरपंचायतीवर आल्याचे पंचायतीचे म्हणणे आहे. सत्ताधारी भाजपने हा ठराव मांडला आहे. ‘स्थानिक महाविकास आघाडीचे नेते आगामी निवडणूक समोर ठेवून या ठरावाला विरोध करत आहेत’, असा आरोप नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी केला आहे.